बँकेने सील केलेल्या मिळकतीत अनाधिकृत प्रवेश

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या मिळकतीचे सील आणि दरवाजाचे लॉक तोडून आत अनाधिकृतपणे प्रवेश केला. ही घटना ३ जुलै ते ६ जुलै दरम्यान मोशी येथील स्पाईन रोडवरील कल्चर क्रेस्ट सोसायटीमध्ये घडली.
विजय हरिभाऊ शिंदे (वय ३८, रा. कात्रज, पुणे, मूळ – सुकेवाडी, संगमनेर, अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरी दत्तात्रय शिंदे (वय ४६, रा. मोशी) आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कल्चर क्रेस्ट सोसायटी मधील मिळकत ताब्यात घेतली होती. मिळकतीला सील लावले होते. मात्र, आरोपींनी बँकेचे सील आणि दरवाजाचे लॉक बेकायदेशीरपणे तोडले. त्यांनी त्या मिळकतीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला, तसेच तेथे बँकेने लावलेला बॅनर फाडून नुकसान केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *