सायबर गुन्ह्यासाठी बँक खात्याचा वापर
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – स्वतःच्या बँक खात्याचा गैरवापर करून संघटित सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार घडवून आणला. ही घटना २ जानेवारी २०२६ रोजी हिंजवडी परिसरात घडली.
या प्रकरणात आरोपी ओमकार विष्णु शिरसाट (रा. शिरसाटवाडी, पाथर्डी, जि. अहमदनगर) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार आर. बी. गोडांबे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘इंडियन ओव्हरसीज बँक’ खात्याचा वापर करून सायबर फसवणुकीचे पैसे स्वीकारले व सायबर गुन्हेगारांना मदत केली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहे.