सायबर फसवणुकीचे पैसे एटीएममधून काढले
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम एटीएमद्वारे काढून फसवणूक केली. ही घटना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे शांताईसिटी, तळेगाव दाभाडे येथे घडली.
माणिक व्यंकट भातने (रा. दरडवाडी, बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई स्वाती राजाराम पाटील (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या ‘इंडियन ओव्हरसीज बँक’ खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर करू दिला. कर्नाटकातील तक्रारदाराचे १०,००० रुपये तळेगाव दाभाडे येथील एटीएममधून काढून आर्थिक गैरव्यवहार केला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.