निगडीत अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त

पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भक्ती-शक्ती चौकाखालील भुयारी मार्गाजवळ करण्यात आली.
पोलीस अंमलदार दीपक पिसे यांनी गुरुवारी (दि. १७ एप्रिल) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका अल्‍पवयीन बालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा शस्त्र विक्रीच्या उद्देशाने भक्ती शक्ती चौकाच्या भुयारी पुलाजवळ आला होता. याबाबत माहिती मिळाली असता निगडी पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *