गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त; वारजे येथील तरुणाला अटक

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – किवळेगावातील बापदेव महाराज मंदिराजवळील मोकळ्या मैदानात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २५ एप्रिल) रोजी रात्री पावणे बारा वाजताच्‍या सुमारास ही कारवाई करण्‍यात आली.
मुबारक उर्फ डब्या माजिद कुरेशी (वय २५, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे) असे गुन्‍हा दाखल केल्‍यानंतर अटक करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. रावेत पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष दशरथ कोळगे (वय ४२) यांनी रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही आरोपीने नियमांचे उल्लंघन केले. २५ एप्रिल रोजी रात्री ११:४० च्या सुमारास आरोपी मुबारक हा ५० हजार ५०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना बाळगताना मिळून आला. रावेत पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *