तळेगाव एमआयडीसी मध्ये वॉटर एटीएम फोडले

तळेगाव चाकण रोडवर माळवाडी येथे उघड्या जागेत बसवलेले वॉटर एटीएम फोडून अज्ञात चोराने त्यातील गल्ल्यातून अंदाजे १० हजार रुपयांची नाणी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (९ जून) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

या प्रकरणात ऋषीकेश मसु साखरे (३१, माळवाडी, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण रोडवर नागरिकांच्या सुविधेसाठी उघड्या जागेत आरओ वॉटर फिल्टर बसवण्यात आला होता. अज्ञात इसमाने या फिल्टरची तोडफोड केली आणि फिल्टरच्या कॉईन गल्ल्यामध्ये जमा झालेली अंदाजे १०,००० रुपये किमतीची नाणी चोरून नेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *