‘तू मालकाचा चमचा आहेस’ म्हणत तरुणावर हल्ला

हिंजवडी येथील हुलावळे वस्तीत जुन्या रागातून एका तरुणाने फिर्यादीला ‘तू मालकाचा चमचा आहेस’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि लोखंडी हत्याराने डोक्यावर व हातावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (१० जून) रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली.

बालाजी शेषराव शिंदे (३८, हिंजवडी, पुणे; मूळ- माणगाव, रायगड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिक्रम मदन सरकार (२६, हिंजवडी, पुणे; मूळ- नदीया शांतीपूर, पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या एका मित्राला चाळीतून बाहेर काढल्याचा राग मनात धरला होता. याच रागातून आरोपीने फिर्यादी समोर आल्यावर “तू मालीक का चमचा है, आज तुझे बताता हूँ, मैं कौन हूँ!” असे म्हणत त्यांना घाणेरडी शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यावर आणि डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *