पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – दिघी परिसरात कामाला नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला बिअरच्या बाटलीने मारहाण केली. तसेच याचा जाब विचारणा-या बहिणीचाही विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ममता चौकाजवळ घडली आहे.
प्रदीप सिंग (रा. साई पार्क, दिघी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सावंतनगर, दिघी येथे राहणा-या ३८ वर्षीय तरुणाने सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला कामासाठी नकार दिला होता. याच रागातून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात बिअर आणि सोड्याची बाटली मारून त्यांना जखमी केले. जेव्हा फिर्यादीची बहीण विचारणा करण्यास गेली, तेव्हा आरोपीने तिच्या अंगावर धावून जात शर्ट ओढून तिचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला नोटीस देऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दिघी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक कटपाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कामास नकार दिल्याने वेल्डरला मारहाण; बहिणीचा विनयभंग
