पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका: चाकणचा मटका किंग रफीक काझी जेरबंद; MPDA अंतर्गत रवानगी थेट अमरावती कारागृहात!

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेत मोठी यश संपादन केले आहे. दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईतपणे मटका आणि जुगार अड्डे चालविणारा कुख्यात आरोपी रफीक शगीर काझी (३९) याला पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. आरोपीची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
​१८ गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगारावर ‘सर्जिकल स्ट्राईक’
​आरोपी रफीक काझी (रा. काजीवाडा, महात्मा फुले चौक, चाकण) हा परिसरात ‘कल्याण’ नावाचा मटका आणि जुगाराचे अवैध धंदे चालवत होता. त्याच्यावर आतापर्यंत तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण होते. ही बाब गांभीर्याने घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता.
​अशी झाली कारवाई…
​पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर आरोपी रफीक काझी हा फरार झाला होता. मात्र, महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने त्याचा माग काढला. अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेऊन २१ एप्रिल २०२६ रोजी अमरावती कारागृहात १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
​”शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध आमची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”
— विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.
​या पथकाने बजावली महत्त्वाची कामगिरी:
​ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्वेता खेडकर, आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
​कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक: विजय ढमाळ
​पोलीस निरीक्षक (गुन्हे): अनिल देवडे
​सहायक पोलीस निरीक्षक: भास्कर पुल्ली
​व पोलीस कर्मचारी: चव्हाण, चिंचकर, संतोष जगताप, नंदू तरटे, गणेश मापारी.
​चाकण आणि महाळुंगे परिसरात या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *