Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप

By Team News Beez
June 5, 2026 2 Min Read
0

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाचा संकल्प

पिंपरी, ५ जून (प्रतिनिधी): औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलताना आता हे शहर ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत, येणाऱ्या पिढीसाठी ‘शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त भविष्य’ देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने यात योगदान द्यावे. केवळ वृक्षारोपण न करता, त्या झाडांचे संवर्धन करत या मोहिमेला आता ‘लोकचळवळ’ बनवा,” असे आवाहन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘एक पेड माँ के नाम’ आवाहनानुसार बारा घोलप महाविद्यालय परिसर आणि सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानिमित्त आमदार जगताप बोलत होते. यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर माई ढोरे, नगरसेवक नवनाथ जगताप, हर्षल ढोरे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे, रवीना आंगोळकर, तसेच दुर्गाकौर आदियाल, महामंत्री मधुकर बच्चे, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे यांच्यासह पक्षाचे विविध मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या निमिताने वृक्षसंवर्धन, जतन आणि पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले की, “झाड लावणे ही केवळ एक औपचारिकता नसून, ती भविष्यासाठी केलेली सामाजिक गुंतवणूक आहे. ही मोहीम आता शहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी आणि घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांनी दत्तक घेतलेले एक झाड, हीच या मोहिमेची खरी यशस्विता असेल.” आधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा मेळ घालत पिंपरी-चिंचवडला स्मार्ट आणि शाश्वत शहर म्हणून विकसित करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

——————————-

देशी वृक्षांच्या लागवडीवर भर

आज वृक्षारोपण मोहिमेत शोभेच्या झाडांऐवजी बकुळ, कडुलिंब, कदंब, ताम्हण, बहावा आणि महोगणी अशा बहुउद्देशीय आणि औषधी गुणधर्म असलेल्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. हे वृक्ष केवळ सावली देणारे नसून, स्थानिक पक्षी आणि कीटकांच्या जैवविविधतेसाठी पोषक आहेत. तसेच, महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या ‘ताम्हण’ची लागवड करून सांस्कृतिक वारशाचेही जतन करण्यात आले.
———————————

> “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील ‘शाश्वत विकास’ आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. शहराचा औद्योगिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दत्तक घेऊन वृक्षारोपण मोहिमेचे एका मोठ्या लोकचळवळीत रूपांतर करावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना गती देत, निसर्गाच्या सोबतीने पिंपरी-चिंचवडला एक ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

— आमदार शंकर जगताप
(चिंचवड विधानसभा मतदारसंघ)

Tags:

MLA Shankar Jagtap
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

नद्यांचा श्वास कोंडला; इंद्रायणी, पवना आणि मुळा प्रदूषणाच्या विळख्यात

Next

अनेकांचा जीव घेणारा फुगेवाडी मधील ‘तो’ दारू अड्डा सायंकाळ पर्यंत होणार जमीनदोस्त….महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी हातोडा सुरूच

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme