जुन्या शेतीच्या वादातून महिलेला मारहाण

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – जुन्या शेतीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करून दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्‍यातील चोरघेवाडी येथे घडली.
या प्रकरणात एका महिलेने रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर लक्ष्मण चोरघे (वय २९, रा. चोरघेवाडी, पाईट, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या त्यांच्या राहत्या घरापाशी असताना, जुन्या शेतीच्या वादाच्या रागातून आरोपीने त्यांना गाठले. “तू पाईपलाईन का फोडणार आहेस” असे विचारताच त्याने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने हाताने, बुक्क्याने आणि दगडाने मारहाण करून दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली. उत्तर महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *