जास्त नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेला दोन लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना ३० एप्रिल २०२५ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान हिंजवडी फेज १ येथील सासवडे वस्ती रोडवर घडली.
या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेसर्स आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर लिमिटेड ही कंपनी आणि त्यांचा कर्मचारी ओमकार भिलारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने फिर्यादीला फोन आणि मेसेज करून शेअर बाजारात गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला तीन लाख रुपये घेऊन विश्वास संपादन केल्यानंतर, दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होईल असे सांगून पुन्हा दोन लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर कोणताही नफा किंवा मूळ रक्कम परत न देता फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
