अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून, सखल भागात पाणी साचणे, नाले-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, पावसाच्या काळात नदी, नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
