pimpri chinchwad-​चाकणमध्ये गावठी पिस्तूलासह तरुण अटकेत

Close view of a handgun with bullets on a wooden surface, emphasizing firearms and ammunition.

पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – चाकण परिसरातील चक्रेश्वर रोडवर बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला चाकण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

ही कारवाई शुक्रवारी दुपारी सव्‍वाचार वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.

गौरव मच्छिंद्र डोगरे (वय २९ वर्षे, रा. चाकण, मूळ रा. चक्रेश्वर रोड) असे अटक करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुमीत जगताप यांनी शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी या संदर्भात फिर्याद दिली आहे. ​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री कॉलेजसमोरील ओढ्याजवळ आरोपी संशयास्पद रितीने वावरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना मिळून आले.

शहरात सध्या पोलीस आयुक्तांचे शस्त्रबंदी आदेश लागू असताना त्याने हे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस ठाण्‍यातील हवालदार डगळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *