कौटुंबिक वादातून सासूच्या डोक्यात सिमेंटचा गट्टा मारला

पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – किरकोळ घरगुती वादातून सून, तिची आई आणि बहिणीने मिळून ५५ वर्षीय सासूला सिमेंटचा गट्टा मारून जखमी केले. ही घटना १७ जुलै रोजी वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टीत घडली.
सून निकीता (वय २८), तिची आई सुनिता (वय ५०) व बहीण सोनी (वय २०) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍यांची नावे आहेत. सासू लता जगन्नाथ लांडगे (वय ५५, रा. म्हातोबानगर, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या भांडणाचा राग धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. आरोपी सोनीने फिर्यादीचे हात धरले आणि तिच्या आईने डोक्यात सिमेंटचा गट्टा मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *