पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – गांजा हा मादक पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २५ जून २०२६ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास दिघी येथील कबड्डी ग्राउंड स्मशानभूमी जवळील मोकळ्या जागेत करण्यात आली आहे.
विवेक कैलास मस्के (वय २१, रा. दिघी, मूळ रा. बुलढाणा) याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई नितीन उत्तम लवटे यांनी दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सदर ठिकाणी बेकायदेशीर व अंमली पदार्थ असलेल्या गांजाचे उघडपणे सेवन करत असताना पोलिसांना रंगेहाथ मिळून आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहे.
गांजा ओढताना तरुण पोलिसांच्या जाळ्यात
