पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एका आरोपीकडून दारूबंदी पथकाने मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २२ जून रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास थवडे येथील लक्ष्मीबाई कॉलनी समोर करण्यात आली.
विनोदकुमार जुन्नीकाल बसोर (वय ३८, रा. ताथवडे) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या दारू बंदी पथकातील पोलीस शिपाई मितेश मोहन यादव यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा ताथवडे येथील शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या रोडवर निलगिरीच्या झाडाजवळ विनापरवाना दारू विकत होता. पोलिसांचा छापा पडताच आरोपी पळून गेला. घटनास्थळावरून २ हजार १२० रुपये किमतीचा पॉवर लाईन पंच देशी दारूचा साठा जप्त केला. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.
बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
