पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – शेअर मार्केट व बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची ८८ लाख २६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. ९ फेब्रुवारी ते ६ जून २०२६ दरम्यान वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
सोशल व्हेंचर कॅपिटलिस्ट लिंक धारक, समृद्धी, प्रथम पटेल आणि विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत स्वामी कृपा बंगला, वाल्हेकरवाडी, चिंचवड यांनी सायबर पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला परदेशी शेअर मार्केट व बिटकॉइनमध्ये २०० ते ३०० टक्के नफा मिळण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीवर नफा दाखवून तो काढण्यासाठी कन्व्हेंजन फी, टॅक्स आणि जीएसटीच्या नावाखाली वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरून घेऊन ८८ लाख २६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहे.
परदेशी शेअर मार्केटच्या नावाखाली ८८ लाखांची फसवणूक
