पगाराच्या पैशांवरून मालकाच्या भावावर दगडफेक

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पगाराचे पैसे मागण्याच्या कारणावरून कामगाराने आपल्या साथीदारांसह मिळून मालकाच्या भावाला बेदम मारहाण केली. ही घटना तळवडे येथील भालेकर इंडस्ट्रीयल परिसरात बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
​याप्रकरणी राजेश तुकाराम जगताप (वय २४ वर्षे), गणेश रामचंद्र जगताप (वय २२ वर्षे) आणि त्‍यांचा एक साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. सिध्दन्ना बसवराज कमातगी (वय ४३, रा. भोसरी एमआयडीसी) यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कामगार राजेश जगताप याने पगाराचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद घातला. त्याने प्रथम एका साथीदार मित्रासह आणि दुसऱ्या वेळी चुलत भाऊ गणेश याच्यासह येऊन फिर्यादीचा भाऊ रमेश याला शिवीगाळ करत मारहाण केली. राजेशने हातातील धातूच्या कड्याने आणि गणेशने दगडाने डोक्यात मारून रमेशला जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस ठाण्यातील हवालदार भोमाळे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *