कासारसाई येथे भिंत पाडून ऑफिस कंटेनरची चोरी

​पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे एका खासगी प्लॉटमधील १ लाख २५ हजार रुपये किमतीचा लोखंडी ऑफिस कंटेनर जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना १० ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये सकाळी साडेआठ वाजताच्‍या सुमारास घडली.
​याप्रकरणी डॉ. पंकज पोपटराव येवले (वय ५३, रा. गंगाई निवास, अमृतवेल कॉलनी, रहाटणी) यांनी शनिवारी (दि. २ मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आनंद लाटे, मधुकर बावकर, एक क्रेन चालक आणि क्रेनवरील कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास कासारसाई येथील सर्व्हे नं. १९/१ मध्ये घडली. आरोपींनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या प्लॉटमध्ये प्रवेश केला. तिथे असलेली कंपाउंडची भिंत पाडून अतिक्रमण करण्याची धमकी दिली आणि फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर प्लॉटमध्ये असलेला १ लाख २५ हजार रुपयांचा लोखंडी ऑफिस कंटेनर क्रेनच्या साहाय्याने जबरदस्तीने चोरून नेला. ​या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साळी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *