Kolhapur-‘वनतारा’तील उपचारानंतर हत्तीण माधुरी कोल्हापूरला परतणार; दीर्घकालीन देखरेखीची गरज
कोल्हापूर(kolhapur) : एक वर्षभर ‘वनतारा’ येथे उपचार घेतल्यानंतर हत्तीण माधुरी हत्तीण आता कोल्हापूरला परत जाण्यास सज्ज झाली आहे. पायांच्या हाडांतील गंभीर दुखापतीमुळे तिला दीर्घकालीन उपचारांची गरज असल्याचे पशुवैद्यकांनी स्पष्ट केले आहे.
‘वनतारा’मध्ये उपचारादरम्यान तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ती आता वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आणि हालचालींसाठी अधिक सक्षम झाल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, पुढील काळात तिच्या आरोग्यासाठी सातत्याने देखरेख आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
माधुरीला कोल्हापूरमध्ये परत पाठवल्यानंतर स्थानिक पशुवैद्यक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू राहणार आहेत. नियमित रेडिओग्राफिक तपासणी, पायांची विशेष काळजी आणि पोषक आहार यांच्या मदतीने तिच्या प्रकृतीत अधिक सुधारणा अपेक्षित आहे.