pimpri chinchwad-सासरकडील नातेवाईकांकडून तरुणास मारहाण
पिंपरी, दि. २१ (pimpri chinchwad) – घर सोडून गेल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला व त्याच्या भाच्याला लाकडी बांबूने आणि दगडाने मारहाण केली. दिघी येथील च-होली भागात ही घटना १९ जून रोजी घडली.
प्रकाश महादेव राठोड (वय ३४, रा. समर्थ नगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अक्षय नामदेव चव्हाण (वय २०), अनुराग नामदेव चव्हाण (वय २२) आणि रेणुका नामदेव चव्हाण (वय २३, सर्व रा. दिघी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घर सोडून गेल्याने लहान मेहुणा अक्षयने लाकडी बांबूने फिर्यादीच्या पाठीवर व मानेवर मारहाण केली, तर मोठा मेहूणा अनुरागने डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यास आलेल्या फिर्यादीच्या भाच्यालाही मारहाण करण्यात आली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.