Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

Pimpri-Chinchwad-स्वच्छतेचा संकल्प; १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’! मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; गवळीमाथा-फुगेवाडी मॉडेल आता शहरभर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींचे स्पष्ट आदेश

By Sumedh Chapalgaonkar
July 20, 2026 1 Min Read
0

पिंपरी-चिंचवड :
मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, शाश्वत आणि प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील किमान एका झोपडपट्टीत १५ ऑगस्टपूर्वी ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथे यशस्वी ठरलेल्या मॉडेलची आता संपूर्ण शहरात अंमलबजावणी होणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरातून कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, ओला व सुका कचरा स्वतंत्र संकलन, घरगुती कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, परिसराची नियमित स्वच्छता आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे. महिला बचत गट, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मोशी दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक विकेंद्रित करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. मोठ्या प्रमाणावर कचरा एकाच ठिकाणी साठविण्याऐवजी प्रत्येक परिसरातच कचऱ्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याची संकल्पना या प्रकल्पातून प्रत्यक्षात आणली जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, वाहतुकीवरील ताण घटेल आणि पर्यावरणीय धोकेही कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम तसेच उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांना प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने तातडीने योग्य झोपडपट्टीची निवड करून नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गवळीमाथा आणि फुगेवाडी येथील यशस्वी प्रकल्पाचा अभ्यास करून त्याच धर्तीवर काम करण्यासही सांगितले आहे.

महापालिकेच्या या उपक्रमामुळे झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतेची नवी संस्कृती रुजेल, नागरिकांचा सहभाग वाढेल आणि ‘स्वच्छ, निरोगी व पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड’ घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. १५ ऑगस्टपर्यंत शहरातील प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ उभी करण्याचे लक्ष्य आता महापालिकेसमोर आहे.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Delhi-पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रणाचा निर्णय अद्याप नाही; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

Next

Delhi-दिल्ली आंदोलनादरम्यान निखिल वागळे यांचा गंभीर दावा; ‘विद्यार्थ्याला मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला, DCP ने पकडून धमकावले’

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’
  • Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप
  • Pimpri-Chinchwad-दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ नेहरूनगर न्यायालयात वकिलांचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा
  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

CATEGORIES

  • Uncategorized (449)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’
  • Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप
July 24, 2026

Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर टीका...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : दादर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : 20 जुलै रोजी दिल्लीतील संसद मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरून नवा वाद निर्माण...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ नेहरूनगर न्यायालयात वकिलांचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, २४ जुलै : दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक प्रश्नांबाबत सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

Sumedh Chapalgaonkar

दिल्लीस्थित *कॉकरोच जनता पक्ष (CJP)* यांच्या पुण्यातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme