Delhi-दिल्ली आंदोलनादरम्यान निखिल वागळे यांचा गंभीर दावा; ‘विद्यार्थ्याला मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला, DCP ने पकडून धमकावले’
नवी दिल्ली :
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पोलिसांच्या वर्तणुकीबाबत गंभीर आरोप केले आहेत. एका विद्यार्थ्याला पोलीस मारहाण करत असल्याचे पाहून आपण त्यांना “का मारताय?” असा जाब विचारला, असा दावा त्यांनी केला आहे.
वागळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका डीसीपीने त्यांना पकडून दाबून धरले आणि धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी उपस्थित असलेल्या युट्युबर्स आणि आंदोलनकर्त्यांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे आपली सुटका झाल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि त्यावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले असून, विविध नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांकडून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.