बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात मागवून ती एटीएमद्वारे काढून घेतली. ही घटना १५ सप्टेंबर रोजी वराळे (ता. मावळ) येथे घडली.
सोमनाथ जाधव (रा. मंगरुळ, पो. आंबी, ता. मावळ) व त्याच्या याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस शिपाई पोपट रोहीदास हुलगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःचे पंजाब नॅशनल बँकेचे खाते सायबर गुन्ह्यासाठी उपलब्ध करून दिले. विविध राज्यांतील सायबर तक्रारींमधील रकमेपैकी पाच हजार रुपये एटीएमद्वारे काढून फसवणूक केली. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.