गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई २६ जुलै रोजी सायंकाळी पुनावळे गावठाण येथे केली.
विकास सुबोध ढोले (वय २२, रा. दर्शिले मळा, पुनावळे; मूळ रा. नांदेड) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई सौदागर देविदास लामतुरे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या दुचाकीमध्ये ७१ हजार ७०० रुपये किमतीचा २३४ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगून असताना मिळून आला. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहे.
—