वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी सायंकाळी करण्यात आली.
या प्रकरणी नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार गणेश कारोटे यांनी गुरुवारी (दि. १४ मे) रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील इंद्रायणी नदीवर नवीन झालेल्या पुलावर ही महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करत उभी होती. यादरम्यान ती येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक शिष्टाचाराचा व सभ्यतेचा भंग करत असताना मिळून आली. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *