पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार शस्त्र बाळगताना आढळून या. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी सकाळी देहूरोड येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मागे करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस शिपाई मोमीन शेख यांनी गुरुवारी (दि. १४ मे) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर दीपक डिक्का (वय २३, रा. पारशी चाळ, देहूरोड) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर याला १२ डिसेंबर 2024 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर देहूरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
