सामान शिफ्टिंग करणाऱ्या कामगारांना मारहाण

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – सामान शिफ्टिंगचे काम करत असताना चार जणांच्या टोळक्याने कामगारांना शिवीगाळ करत लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. १३ मे) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बावधन येथील ग्लोरिया आयटी पार्क येथे घडली.
या प्रकरणात सचिन पांडुरंग पिटले (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव, पुणे; मूळ गाव: परभणी) यांनी गुरुवारी (दि. १४ मे) रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी लालमतकुमार भोडेला आदिवासी, संजीवकुमार श्रीरामप्रसाद तिवारी, अनुज पवन मिश्रा आणि अनिलकुमार रामप्रकाश मिश्रा (सर्व रा. ग्लोरिया आयटी पार्क, बावधन, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ग्लोरिया आयटी पार्क येथे सामान शिफ्टिंगचे काम करत असताना आरोपींनी त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. त्यानंतर या चौघांनी मिळून फिर्यादींना लाथा-बुक्क्यांनी मारले आणि मागून येऊन लाकडी बांबूने फिर्यादी तसेच त्यांचे सहकारी सिद्धार्थ सोनवणे व अभिषेक फासगे यांच्या डोक्यात, पाठीवर आणि हातावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *