निगडीत तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेला असतानाही शहरात विनापरवाना प्रवेश करून हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास…
घरगुती गॅस सिलेंडरची अवैध रिफिलिंग; एकाला अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे गुूरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास…
वायर तुटल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून डॉक्टरला मारहाण
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – श्रीलक्ष्मी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची वीज यंत्रणा टँकरमुळे खंडित झाली. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला काही जणांनी महिलेसह तीन जणांनी लाठ्या आणि दगडांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी…
गांजा विक्री करणाऱ्याला पोलिसांकडून अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील बघलवाडी येथे विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार भिमराव…
साडेअकरा लाखांचे मेफेड्रोन जप्त; तीन तस्करांना अटक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खालुंब्रे येथे कारवाई करून ११ लाख ६५ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २२ एप्रिल)…
वाहन अपघातात दुचाकीस्वारांची दादागिरी; कारचेही नुकसान
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – हिंजवडी येथील इन्फोसिस सर्कलजवळ एका दुचाकीने कारला धडक देऊन नुकसान केले. याबाबत जाब विचारला असता दुचाकीवरील पिता-पुत्रीनु कारमधील महिलेला धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि. २२ एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसहा…
पान मसाल्याच्या पैशावरून वाद; कडाचीवाडीत तरुणाचा पाय फॅक्चर
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे पान मसाल्याच्या पुडीचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पाय फॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा…
किराणा दुकानदाराला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील निघोजे येथे पाणी टॅकरमुळे वायरींग तुटल्याच्या कारणावरून एका किराणा दुकानदाराला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवार, (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास सुभाषवाडी येथे…
आळंदी येथे आढळला पहिल्यांदा 9 फुटी अजगर
आज रोजी 23 एप्रिल सकाळी 8 वा आळंदी वडगाव रोड येथे आयजीडब्ल्यू कंपनी मध्ये मोठा साप झाडावर असल्याची माहिती वन्यजीव रक्षक आकाश सूर्यवंशी यांना मिळाली तेव्हा त्वरीत घटना स्थळी पाहणी करून अजगर असल्याचे निष्पन्न झाले अजगराला सुखरूप पकडून वन अधिकारी भाऊसाहेब…
बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची साडेसात कोटींची फसवणूक
पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून सुवर्णयुग सहकारी बँकेची सात कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना गणेश व्हिजन, आकुर्डी येथे घडली. मॅसकॉर्प कंपनीचे…