छत्रपती संभाजीनगर(Sambhajinagar) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाढती राजकीय फोडाफोडी, संभाव्य बंडखोरी आणि ‘ऑपरेशन टायगर’सारख्या चर्चांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील पक्षांतराच्या वाढत्या घटनांवर टीका करताना नांदगावकर यांनी पक्षांतर बंदी कायदा प्रभावी नसल्याचा आरोप केला. लोकप्रतिनिधी वारंवार पक्ष बदलत असल्याने मतदारांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी ईव्हीएम प्रणालीऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. ईव्हीएममुळे लोकांचा विश्वास कमी होत असल्याचा दावा करत, त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले.
नांदगावकर यांनी सध्याच्या राजकीय वातावरणाला “आया राम-गया राम” संस्कृतीची पुनरावृत्ती असल्याची टीका केली असून, पक्षनिष्ठेपेक्षा सत्तेच्या राजकारणाला अ
