Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

उद्यानातील अनधिकृत बांधकामावरून भोसरीत भाजप-राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आमनेसामने

By Team News Beez
May 18, 2026 3 Min Read
0

राजकीय वातावरण तापले;भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा

पिंपरी, 18 मे : भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभाग ११ मध्ये समाविष्ट असलेल्या एका बागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर धार्मिक बांधकामामुळे भाजपच्या विद्यमान आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी लोकप्रतिनिधी एकमेकांसमोर आल्या. जाहीरपणे घोषणाबाजी करत थेट लोकांसमोरच लोकप्रतिनिधींसह माजी आमदाराचा एकेरी उल्लेख करण्यात आला. यामुळे सध्याचे आमदार महेश लांडगे यांनाही रस्त्यामध्येच तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.

महापालिका प्रभाग ११ घरकूल परिसरात पालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या परिसरात पाणथळ जागा, धावण्यासाठीचा मार्ग (जॉगिंग ट्रॅक) आणि जुनी-नवी मिळून घनदाट वृक्षवल्ली आहे. या ठिकाणी विविध पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा वावर असतो. स्पाइन रस्ता आणि प्रभाग १० मधील संभाजीनगरच्या मध्यभागी हा परिसर येतो. या जागेवर गेल्या पाच महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम (सध्या त्यांचे सुपुत्र कुशाग्र कदम नगरसेवक आहेत) यांच्या पुढाकाराने जवळपास २५ गुंठे क्षेत्रावर धार्मिक स्थळ उभारण्याचे काम सुरू आहे. या कामाला प्रभाग ११ मधील आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक असलेल्या नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

‘या परिसरातील धावण्याच्या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी नागरिक व्यायामासाठी मोठ्या संख्येने येतात. तसेच पोलिस दलात भरती होण्यासाठी पूर्वतयारी करणारे जवळपास ३०० तरुण दररोज येथे धावण्याचा सराव करतात. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर काम होऊ दिले जाणार नाही.
असे नगरसेविका नागरगोजे यांचे म्हणणे आहे.
मुख्य म्हणजे, आमच्या कार्यक्षेत्रात मंगला कदम यांनी ढवळाढवळ करण्याचे काय कारण? बागेच्या आवारात कोणत्याही प्रकारचे नवे स्ट्रक्चर उभारू दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका योगिता नागरगोजे यांनी घेतली आहे. या कामासाठी सुमारे १० ते १५ मोठी झाडे तोडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

या विषयावर बोलताना नागरगोजे म्हणाल्या, ‘‘बागेतील हे काम गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला लेखी पत्र दिले. मात्र, ते हे काम उद्यान विभागाचे असल्याचे सांगत आहेत. उद्यान विभागाकडे विचारणा केली असता, ते स्थापत्य विभागाकडे बोट दाखवत आहेत. सर्वच विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलून वेळ मारून नेत आहेत. काल (शनिवारी) मी स्वतः महापालिका आयुक्तांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे. ते उद्या (सोमवारी) प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करणार आहेत. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असून ३०० हून अधिक तरुण पोलिस भरतीचा सराव करतात. महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक बागेच्या जागेत पक्के आरसीसी बांधकाम करण्यास कायद्याने मनाई आहे. आमच्या कार्यक्षेत्रात काय कामे करायची, याचा निर्णय आम्ही चारही स्थानिक लोकप्रतिनिधी मिळून घेऊ. बाहेरील व्यक्तींनी यात हस्तक्षेप करू नये.’’
…………..

आमदार लांडगे यांना रोखले
गेल्या दोन दिवसांपासून मंगला कदम आणि योगिता नागरगोजे यांच्यातील हा वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. शनिवारी नागरगोजे यांनी सुरू असलेल्या कामाला प्रत्यक्ष विरोध केला. त्यानंतर रविवारी कदम यांनी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरून थेट आमदार महेश लांडगे यांना गाठले आणि जाब विचारला. आमदार लांडगे एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने या भागातील एका सभागृहात आले होते. कार्यक्रम संपवून ते परतत असताना कदम यांनी त्यांना रस्त्यात रोखले आणि तीव्र शब्दांत सुनावले, ‘आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे गेली १५ वर्षे तुमचे काम करत आहोत. येथील सर्व नागरिक तुम्हालाच मतदान करतात. तुम्हाला पूर्वकल्पना देऊन आणि विचारूनच हे काम सुरू करण्यात आले आहे. तुम्ही मला तसे पत्रही दिले होते. आता मात्र तुमची नगरसेविका सांगतेय की, महेशदादांनीच मला हे काम पाडायला सांगितले आहे. तुमच्या नावाचा वापर करून तिने प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. मी तुम्हाला आधीच विचारले होते. आता मी हे काम पुढे करू की नको? मी विलास लांडे यांचा पराभव करण्यासाठी १५ वर्षे तुमच्या पाठीशी उभी राहिले’.

हा सर्व प्रकार सुरू असताना उपस्थित लोकांचे मोबाईल कॅमेरे चालू असल्याचे लक्षात येताच कदम यांनी ते बंद करायला लावले. या नाट्यमय घडामोडींमुळे पक्षांतर्गत चालणाऱ्या राजकीय खेळी समोर आल्या आहेत. तत्पूर्वी, कदम यांनी नागरगोजे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच प्रभाग ११ मधील भाजपच्या एका लोकप्रतिनिधीचा एकेरी उल्लेखही केला.

Tags:

mangala kadam
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

​सुरक्षा रक्षकाची पडताळणीच नाही; एजन्सी मालकावर गुन्हा

Next

भटक्या कुत्र्याच्या पाठलाग मुळे विहिरीत पडलेल्या मोराची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme