आळंदी इंद्रायणी नदी पात्रात दोन महिलांचे मृतदेह आढळले आळंदी / प्रतिनिधी : येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीतील सिद्धबेट पाणी साठवण बंधाऱ्यात दोन अनोळखी महिलांचे मृतदेह इंद्रायणी नदीपात्रात तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. बुधवारी ( दि. २९ ) संध्याकाळी सात चे सुमारास ही धक्कादायक घटना निदर्शनात आली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तातडीने तपासाचे काम सुरू केले. या घटनेत धक्कादायक माहिती दोन्ही महिला साडीच्या सहाय्याने एकमेकींना घट्ट होत्या. प्राथमिक अंदाजा नुसार, या महिलांनी एकत्रित पणे नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
बुधवारी रात्री सिद्धबेट परिसरातील इंद्रायणी नदी पात्रात तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षांत आले. अधिक जवळ जाऊन पाहिल्याने दोन महिलांचे मृतदेह असल्याचे दिसले. नागरिकांनी तात्काळ आळंदी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत दोन्ही महिलांचे मृतदेह नदी पात्रा बाहेर आणले. या दोन्ही महिला एकमेकींना साडीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मृतांमध्ये एका महिलेचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे आणि दुसऱ्या महिलेचे वय अंदाजे ३५ वर्षांच्या आसपास आहे. या महिला नेमक्या कोण आहेत. आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवले आहेत.
या महिला नातेवाईक की मायलेकी होत्या का ? याचा तपास आळंदी पोलीस करीत आहे. परिसरात महिला बेपत्ता असल्याची तक्रार आहे का, याची माहिती घेऊन पडताळणी पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
इंद्रायणी नदी पात्रात आढळले महिलांचे मृतदेह, परिसरात खळबळ
