पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – लोकांकडून पैसे घेऊन ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार खेळविणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी येथील साईबाबा मंदिरासमोरील मोकळ्या जागेत २६ जून रोजी करण्यात आली.
राजेंद्र बाबुसिंग तामचिकर (वय ५३, रा. भाटनगर, पिंपरी) याच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार देवा शिवाजी राऊत यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनापरवाना स्वतःच्या फायद्यासाठी मटका जुगार चालवत असताना त्याच्याकडून ४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
—
पिंपरीत मटका जुगारावर पोलिसांचा छापा
