पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – पिंपरी ब्रीज परिसरातील शिवशंकर मंदिराजवळ पोलिसांनी एका अल्पवयीन बालकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पप्पीसिंग (वय 35, रा. उमरटी, मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अंमलदार रोहित रघुनाथ वाघमारे (वय 32) यांनी बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलेल्या मुलाकडे तपास केला असता, त्याने हे पिस्तुल आणि काडतूस आरोपी पप्पीसिंग याच्याकडून आणल्याचे कबूल केले आहे. शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलाकडून देशी पिस्तुल जप्त
