घरातील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्यावर गुन्हा

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – मांजरींना खायला देण्यासाठी एका व्यक्तीकडे चावी देऊन महिलाउ आपल्‍या गावी गेली. त्या महिलेच्या घरातील साडेचार लाखांचे दागिने त्‍या व्यक्तीने चोरून नेले. ही घटना ६ ते १० मे या कालावधीत गणेशनगर, बोपखेल येथे घडली.
अवतार सिंघवीर सिंग सोहळा (सध्‍या रा. गणेशनगर, बोपखेल. मूळ रा. जालंधर पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने रविवारी (दि. १० मे) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला कोल्हापूर येथे गावी जायचे होते. त्यांच्या घरात मांजरी आहेत. त्यांना खाऊ घालण्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीचा व्यक्ती आरोपी अवतार याला घराची चावी दिली. महिला गावी गेल्यानंतर दोन दिवसांनी आरोपीने त्यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच तुला बघ माझ्या मागे पंजाबपर्यंत यायला लावतो, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या घरातून चार लाख ४७ हजार रुपये किमतीचे १४.९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घरातील कपाटातून चोरून नेले. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *