रामनगरमध्‍ये जुगार खेळणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील रामनगर भागात चिंचेच्या झाडाखाली पैसे लावून जुगार खेळणाऱ्या दोन व्यक्तींवर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार (दि. १० मे) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर ढवळे यांनी रविवारी (दि. १० मे) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतीश शांताराम चौगुले (वय ४२, रा. दत्तवाडी, आकुर्डी), मच्छिंद्र विठ्ठल पवार (वय ५४, रा. रामनगर, चिंचवड), लाला केरू शेलार (वय ४९, रा. चाकण), मोहन मुकुंद लष्करे (वय ६१, रा. चिंचवड), दत्तात्रय गोविंद कांबळे (वय ५०, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास रामनगरमधील पाटील चाळीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत आरोपी तीन पत्‍ती नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता आरोपींकडे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्‍कम असा एकूण एक हजार ५१० रुपयांचा ऐवज मिळून आला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *