पेन्शन कार्डच्या बहाण्याने वृद्धाची ९ लाखांची फसवणूक!

​पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – फेसबुकवर ‘सीनियर सिटीझन्स पेन्शन कार्ड’ची खोटी माहिती देऊन एका ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख १६ हजार ९०० रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. हा प्रकार ४ जून रोजी दुपारी ३:३० ते रात्री ८:१० दरम्यान स्वप्ननगरी सोसायटी, उदयमनगर, पिंपरी येथे घडला.
​याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी अनोळखी फेसबुक अकाउंट धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उदयमनगर, पिंपरी येथील एका ज्‍येष्‍ठ नागरिकाने शुक्रवारी (दि. ५ जून) रोजी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकवर पेन्शन कार्डचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय बँक ऑफ इंडियाच्या दोन खात्यांचे नंबर मिळवून, त्यामधून वेळोवेळी एकूण ९ लाख १६ हजार ९०० रुपये स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेत लबाडीने फसवणूक केली. ​या गुन्ह्याचा पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्‍ठ निरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *