दोन लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे दोन चेक वापरून दोन लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २ सप्टेंबर २०२४ ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली.
कीर्ती राजेश सोमाणी (वय ५०), राजेश रामेश्वर सोमाणी (वय ५५, दोघे रा. परभणी) आणि कमलकिशोर मंत्री (वय ६५, रा. कोथरूड, पुणे) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. अनिता भाऊसाहेब कड (वय ६४, रा. बाणेर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानधन म्हणून दिलेले दोन चेक आरोपींनी संगनमताने व जाणीवपूर्वक वापरून संस्थेचे दोन लाख रुपयांचे नुकसान करत अपहार केला. आळंदी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत