‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्ला
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी फेज २ मधील लॉंजच्या बाहेर बाजूला सरकण्यास सांगितल्याच्या रागातून एका महिलेने काचेची बाटली डोक्यात मारून तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना २५ जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.
मोहिनी बसवराज गाडेकर उर्फ डॉली (वय २५, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, म्हाळुंगे) हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण भवरलाल सुतार (वय ३१, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने पार्किंगमध्ये थांबलेल्या आरोपी महिलेस “मला जायचे आहे बाजूला व्हा” असे म्हटले. याचा राग आल्याने तिने काचेची बाटली डोक्यात मारून गालावर जखम केली. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.