Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

फुगेवाडीत दोन दिवसांत १२ जणांचा गूढ मृत्यू -विषारी दारूचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू

By Team News Beez
May 29, 2026 2 Min Read
0

दोन जणांवर उपचार चालू…प्रकृती चिंताजनक

पुण्याच्या हडपसर परिसरात ही दारू पिऊन पाच जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड : शहरातील फुगेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांत तब्बल १२ जणांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विषारी दारू प्यायल्याने हे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आणखी दोन जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मृत झालेल्या सर्वांनी एका ठिकाणाहून दारू प्राशन केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे विषारी दारूमुळेच हा प्रकार घडल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. याच दरम्यान, पुण्यातील हडपसर परिसरातही कथित विषारी दारू प्राशनामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून दारू पुरवठा करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. परिसरातील अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. परिसरात अवैध दारू विक्री सुरू असतानाही पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून अवैध दारू विक्री कायमची बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फुगेवाडी परिसराला भेट दिली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून परिसरात शोककळा पसरली आहे. अनेक कुटुंबांचे आधारवड हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

कावळ्याच्या घरट्यांतून पावसाचे संकेत; मावळात शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर

Next

मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस च्या इंजिनात बिघाड, ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme