अवैध दारू विक्री करणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास, वराळे गावच्या हद्दीत कोरेगाव फाटा येथे करण्यात आली.
रोहित गोपाळ शिरसट (वय २५, रा. नेसावे, ता. मावळ) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मंगेश कदम यांनी उत्‍तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शासनाचा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून १६ हजार १८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *