पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – प्राधिकरण उद्यान येथे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय महिला शिक्षिकेला तिचा भाऊ व पतीने मिळून दगडाने मारहाण केली. ही घटना १८ जुलै रोजी प्राधिकरण येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या गुन्ह्यात रितेश वासुदेव जाधव (वय २८), विशाल गंगाधर घोगरे (वय ३५, दोघे रा. तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रेशमा वासुदेव जाधव (वय ३२, रा. पुनावळे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रीण उद्यानात फोटो काढण्यासाठी गेले असता रेशमा यांचा भावाने अचानक डोक्यात डाव्या बाजूला दगड मारून जखमी केले, तर पतीने हात धरून कानाखाली मारत शिवीगाळ केली.
तर भाऊ रितेश जाधव याने दिलेल्या फिर्यादीमध्ये रेशमा विशाल घोगरे (वय ३२, रा. पुनावळे) व रोहित जाधव (वय ३३) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीची बहीण उद्यानात मित्रासोबत असताना फिर्यादीने विचारपूस केली. याचा राग धरून बहिणीने मारहाण केली व तिच्या मित्राने पेवर ब्लॉक डोक्यात मारून जखमी केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास रावेत पोलीस तपास करीत आहेत.
—-
प्राधिकरणात शिक्षिकेला दगडाने मारहाण
