Pimpri-Chinchwad-चिंचवडमध्ये तीनपत्ती जुगारावर छापा; पाच जण अटक
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अडड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह पाच जुगाऱ्यांना अटक केली आहे. ही कारवाई १७ जुलै रोजी चिंचवड येथील मालधक्का परिसरात करण्यात आली आहे.
अंजप्पा पल्ले (वय ५६), साहिबु इटकल (वय ६४), तायाप्पा तलवार (वय ७०), मायाप्पा देवनोळ (वय ५३), सचिन उबाळे (वय ४८) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी तुषार विलास मोरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंदनगर येथे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्याकडून ३० हजार ५५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.