मोशीत डीपी बॉक्सला आग; दुपारच्या उकाड्यात वीजपुरवठा खंडित

शॉर्टसर्किटमुळे लागली आग; अग्निशामक दलाची तात्काळ कारवाई
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – मोशीतील बो-हाडेवाडी परिसरात सोमवारी (दि. २७) सकाळी डीपी बॉक्सला अचानक आग लागली. ही घटना शिंदे सरकार चौकाजवळ सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच मोशी अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी तत्परतेने प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमुळे डीपी बॉक्सचे नुकसान झाले. परिणामी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. दुपारच्या कडक उन्हात वीज गेल्याने नागरिकांचे हाल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *