शेअर मार्केटच्‍या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेअर मार्केटच्‍या नावाखाली एका नागरिकाची ३१ लाखांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान निगडी येथील यमुनानगरमध्‍ये घडली.
कनका शर्मा आणि संबंधित खातेदार यांच्‍या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रमेश सोपानराव फाळके (वय ५२, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीला व्हॉट्सॲपवर शेअर मार्केटची लिंक पाठवून कोटक सिक्युरिटीज ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यात ऑनलाइन शेअर्स खरेदी-विक्री करायला लावून नफ्याचे आमिष दाखवत विविध बँक खात्यांवर ३१ लाखांची रक्कम भरून घेतली. मूळ रक्‍कम व परतावा न देता फसवणूक केली. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *