Pimpri-Chinchwad-​चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या

​पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची राहत्या घरात गळा दाबून हत्या केली. ही घटना दि. २८ जून रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास चिंचवड येथील विद्यानगर भागात घडली.
नागनाथ दत्तु कांबळे (वय ४५, रा. विद्यानगर, चिंचवड) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत महिलेच्‍या मुलीने आपल्‍या वडिलांविरोधात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगरमधील आयशा मस्जिदच्या पाठीमागे असलेल्या राहत्या घरात आरोपी नागनाथ याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी वैशाली नागनाथ कांबळे (वय ३५) हिच्याशी वाद घातला आणि तिचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपरी पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *