प्लॉट विक्रीच्या बहाण्याने २.७० लाखांची फसवणूक

​पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – मावळ तालुक्‍यातील डोणे येथील प्लॉट विकण्याचे आमिष दाखवून नोटराईज दस्तऐवज बनवून एका व्यक्तीची २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना मारुंजी येथील ‘गुडविन सिटी लँडमार्क डेव्हलपर्स’च्या कार्यालयात घडली.
​याप्रकरणी जितीन बाळू भोसले (वय ३९, रा. माण, ता. मुळशी) यांनी शनिवारी (दि. ९ मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पूर्णचंद्र स्वैन (रा. अशोक नगर, पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मौजे डोणे (ता. मावळ) येथील प्लॉट क्रमांक २८१ हा ४ लाख ९८ हजार २४० रुपयांना विकण्याचे ठरवले होते. फिर्यादीने वेळोवेळी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे दिले. त्यानंतर आरोपीने नोटराईज ‘एमओयू’ केला, मात्र त्यात जाणूनबुजून सर्व्हे नंबर न टाकता केवळ प्लॉट नंबरचा मोघम उल्लेख केला. पैसे घेऊनही प्लॉटचे खरेदीखत करून दिले नाही किंवा रक्कमही परत केली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *