पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – “आमच्याकडे काय बघतोस” या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांच्या टोळक्याने मिळून एका तरुणाला मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीचा हात फॅक्चर झाला आहे.
याप्रकरणी नागेश अशोक घायतडक (वय ३०, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी शनिवारी (दि. ९ मे) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दीपक लोखंडे (रा. बौद्धनगर), यश रोकडे आणि नौरेज शेख (दोघे रा. एमआयडीसी, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर उभे असताना आरोपींनी रागाच्या भरात फिर्यादीच्या भावाची ज्युपीटर गाडी (MH 14 KM 2934) दगडाने फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादी राहत असलेल्या खोलीच्या दरवाजावर सिमेंटचा गट्टू मारला. आरोपींनी फिर्यादीच्या डाव्या हातावर सिमेंटचा गट्टू मारल्याने त्यांच्या हाताचा अंगठा जखमी झाला असून मनगटाचे हाड फॅक्चर झाले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक राऊत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
मारहाण, वाहनाची तोडफोड करणा-या तिघांवर गुन्हा दाखल
