पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे २१ ऑगस्ट २०२४ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत घडली.
या प्रकरणात एका पीडित महिलेने शनिवारी (दि. ९ मे) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद चौहान (रा. चंदीगड, पंजाब) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑगस्ट २०२४ ते १२ मार्च २०२५ दरम्यान संभाजीनगर, चिंचवड येथील गणेश कॉम्पलेक्समध्ये घडली. आरोपी विनोद चौहान याने फिर्यादीला गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दिले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने ५ लाख १० हजार रुपये दिले. मात्र, मुदत संपल्यानंतर आरोपीने परतावा दिला नाहीच, उलट मूळ रक्कमही परत न देता फसवणूक केली. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे करीत आहेत.
जास्त परताव्याचे आमिष दाखवून महिलेची पाच लाखांची फसवणूक; चंदीगडच्या व्यक्तीवर गुन्हा
